Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ६ वर्षीय मुलीवर अत्याचार करीत खून ; नातेवाईकांचा आक्रोश
    क्राईम

    ६ वर्षीय मुलीवर अत्याचार करीत खून ; नातेवाईकांचा आक्रोश

    editor deskBy editor deskJune 12, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावात राहणाऱ्या एका ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार ११ जून रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे ६ वर्षे चिमुकली आपले आईवडील, दोन बहिणी, एक भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती. दरम्यान गावात राहणारा एकाने याने पीडित मुलीला तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवत तिला मंगळवार ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजता गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा शिवारातील शेतात घेऊन गेला. त्यावर त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून केला. दुसरीकडे दुपारी ४ वाजेपासून मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केली, अखेर रात्री ११ वाजता तिचा मृतदेह चिंचखेडा शिवारातील इंदासी माता मंदिरा जवळील केळीच्या शेतात तिचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला, तिच्या तोंडावर तसेच गळ्यावर जखमा दिसून आल्याने तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे दिसून झाले.

    जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान अत्याचार करणाऱ्या नराधरामाला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. मयत मुलीच्या पश्चात आई-वडील एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान जोपर्यंत नराधमाला अटक होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र मुलीच्या नातेवाईकांनी घेतला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी असल्याचे पाहायला मिळाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.