जळगाव : प्रतिनिधी
मागून येणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षातील भुरे खान जखमी झाला. तो बालंबाल बचावला मात्र रिक्षाचे नुकसान झाले आहे. ही घटना महामार्गावरील साकेगाव पुलाजवळ रविवार दि. ९ रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील हेडकरी मोहल्ल्यात मेहमूद खान सरफराज खान (वय ३४) हे रिक्षाचालक वास्तव्यास आहे. ते त्यांचे भाऊ भुरे खान यांच्याोबत (एम.एच.१९ सी. डब्ल्यू ०८५३) क्रमांकाच्या रिक्षाने भुसावळकडून नशिराबाद येथे येत होते. रिक्षा साकेगाव पुलावरून जात असताना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एम. एच. ४ एल.वाय. ४०७१) क्रमांकाच्या कंटेनरन चालक ओव्हरटेक करत असताना त्याने रिक्षाला धडक दिली. या अपघातात भुरे खान हेही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर न थांबता कंटेनरचालक वाहन घेऊन पसार झाला. याप्रकरणी तक्रारीनुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सहायक फौजदार हरेश पाटील करीत आहेत.