चोपडा : प्रतिनिधी
आदिवासी भागात सातपुडा पर्वतरांगांमधील वैजापूर गावाच्या हद्दीत खाऱ्यापाडा ते वैजापूर या रोडवर मंगळवारी सायंकाळी ४:४५ वाजेच्या सुमारास राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (३०, पार उमर्टी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) हा तीन गावठी कट्टे आणि दहा जिवंत काडतुसे घेऊन जाताना ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये पोहेकॉ मनोज दुसाने यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीचे तीन गावठी कट्टे आणि दहा हजार रुपये किमतीची १० काडतुसे, असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोहेकॉ पल्लवी सुभाष वाणी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर अधिक तपास करीत आहेत.