मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्यातील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या होमगार्ड बांधवांच्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती.
या बैठकीत होमगार्डचे मानधन विहित वेळेत अदा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांना विमा सुविधा आणि १८० दिवस नियमित स्वरूपात काम उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. होमगार्डच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी सर्वतोपारी सहकार्य करण्यात येईल, असे अश्वासन होमगार्ड यांना देण्यात आले.