लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुजराती गल्ली राहणारे जगन्नाथ मोतीराम धनगर यांना त्यांची तीनही मुले त्यांना संभाळत नसून शेतजमीन परस्पर नावे केल्याबाबत तक्रार स्वत: जगन्नाथ धनगर यांनी धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेत तीनही मुलांना एरंडोल प्रांताधिकारी यांच्या समोर उभे केल्यानंतर चौकशी केली असता खरचं माझी मुले माझा संभाळ करत असून माझी मानस्थिती ठिक नसल्याची कबुली जगन्नाथ धनगर यांनी दिली.
सविस्तर माहिती अशी की, गुजराथी गल्लीमधील वृद्ध इसम जगन्नाथ मोतीराम धनगर यांनी त्यांची मुले दिलीप जगन्नाथ धनगर, अरुण जगन्नाथ धनगर व गोविंदा जगन्नाथ धनगर यांचे विरुद्ध सांभाळ करत नसल्याचे व त्यांना अंधारात ठेवून जमीन बळकावल्या बाबत तहसिलदार यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांची तीनही मुले प्रांताधिकारी विनय गोसावी व धरणगाव तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या समक्ष शुक्रवारी ७ जानेवारी २०२२ रोजी तहसील कार्यालयात उपस्थित झाले. दरम्यान, माझी मुले माझा सांभाळ करतात व माझी मनस्थिती ठीक नसल्याने त्यादिवशी माझ्याकडून चुकीने तहसिलदारांना माहिती देण्यात आली होती. तसा अर्ज मी केला होता. परंतु चारही मुले माझा व्यवस्थित सांभाळ करत असल्याने आता मी तो अर्ज मागे घेत असल्याचे जगन्नाथ धनगर यांनी जबाब दिला आहे.
काय म्हणाले तहसिलदार…
प्रशासनाची भूमिका यात महत्त्वाची ठरली असून सदर वृद्ध इसमाने त्या दिवशी दिलेले बयाण आज रोजी चौकशीमध्ये बदलविले आहे, प्रशासनाने चौकशी करून जाणून घेतले व खरा प्रकार समोर आला. त्यामुळे सदर अर्ज खारीज करणेबाबत प्रस्ताव प्रांत सो एरंडोल यांना पाठवून दिला आहे.
अन् दोघं मुलांनी दिली माहिती, सुभाष जगन्नाथ धनगर, जगन्नाथ मोतीराम धनगर
आम्ही तीनही भाऊ आमच्या वडिलांचा व्यवस्थितपणे सांभाळ करतो. नवीन मोठ्या घरामध्ये वडिलांसाठी आम्ही एक रूम स्पेशल काढलेला आहे. परंतु वयोमानानुसार वडिलांची मनस्थिती ठीक नसल्याने असा प्रकार झाला असावा. मागेसुद्धा वडिलांनी २०१९ मध्ये नूतन सोसायटीमध्ये असाच प्रकार केला होता. सर्व शेजाऱ्यांकडून आपण चौकशी करू शकता.
अन् वृध्दाने केला खुलासा…
माझे वय आता ९० ते ९२ च्या दरम्यान आहेत. स्मरणशक्तीचा समतोल ढासल्यामुळे माझा कडून असा प्रकार घडला. मी माझ्या मुलांचा वर्तणुकीबद्दल समाधानी आहे. ते सर्व माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतात. परंतु मनस्थिती ठीक नसल्यामुळे माझ्याकडून त्या दिवसाचा प्रसंग घडला. या प्रसंगामुळे बऱ्याच जणांना मनस्ताप झाला. त्यामुळे कृपया माझी बाजू समजून घेणे.