Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भावा-बहिणीसह तीन भावी डॉक्टरांचा रशियात बुडून मृत्यू
    क्राईम

    भावा-बहिणीसह तीन भावी डॉक्टरांचा रशियात बुडून मृत्यू

    editor deskBy editor deskJune 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या अमळनेर येथील भावा- बहिणीचा वोल्खोव्ह नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता घडली. रशियात बुडून मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील तरुणांची संख्या आता तीन झाली आहे.
    जिया फिरोज पिंजारी (२०) व जिशान अशफाक पिंजारी (२०, दोन्ही रा. अमळनेर), अशी या भावा बहिणीची नावे आहेत. याच घटनेत मंगळवारी भडगाव येथील हर्षल अनंतराव देसले (१९) याचाही मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री ते भोजन करण्यासाठी बाहेर पडले.

    मिळालेल्या माहितीनुसार, व्होल्का नदीकाठावरील चौपाटीवर थोडा वेळ घालवला. तेथे जिया ही नदीपात्रात उतरली. त्याबाबत जिशानने व्हिडिओ कॉल केला होता. अशफाक व त्यांच्या परिवाराने जियाला पटकन पाण्यातून बाहेर काढ, असे भलते साहस करू नका, म्हणून बजावले. त्यावर जिशान हो म्हटला. मात्र लाट आल्याने त्यांच्यासह ५ जण वाहून गेले. मात्र त्यातील केवळ एक विद्यार्थिनी बचावली. त्यातील तिघे जिल्ह्यातील आहेत. ४ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही माहिती चोपडा येथील डॉ. जुनेद पिंजारी यांना कळविण्यात आली. ते चोपड्याहून अमळनेरला आले. अशफाक आणि त्यांच्या परिवाराला दुर्घटनेबाबत माहिती दिली. रात्रीच येथून ते दिल्लीला व तेथून ताश्कंदला ६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पोहोचले. मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दूरध्वनीवरून अशपाक व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. प्रांताधिकारी महादेव खेडकर व जि.प.च्या माजी सदस्या जयश्री पाटील यांनी अशफाक याच्या घरी भेट दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वनविभागाचा छापा; ७,५०० किलो डिंकसह आरोपी पकडले

    March 27, 2026

    चाळीसगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

    March 27, 2026

    पोलीस निरीक्षक महेश शर्मा नियंत्रण कक्षात बदली

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.