मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसून मी त्याची जबाबदारी स्वीकारत असून उपमुख्यमंत्री पद सोडण्यास तयार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
दि. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला आहे. भाजपाला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले असून या अपयशाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष नेतृत्वाकडे करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.