जळगाव : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्यात आली असून जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागेवर भाजपच्या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरु असतांना रावेर लोकसभा मतदारसंघाचे भाजप सोडून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारांनी सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला आहे.
ईव्हीएम मशीन संदर्भात तक्रार करूनही दखल घेत नसल्याने उमेदवार आक्रमक झाले असून त्यांनी मतमोजणी देखील बंद पाडल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघातील टेबल नंबर 11 आणि टेबल नंबर 13 यांची व्हीव्हीपॅटनुसार मतमोजणी करण्याची केली मागणी असून इव्हीएम मशिनची बॅटरी 99 टक्के चार्जिंग कमी कशी काय झाली. इतके दिवस चार्जिंग का कमी झाली नाही. मतदान झाले होते तर चार्जिंग का संपली नाही असा आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे तसेच या ठिकाणी न्याय न मिळाल्यास कोर्टात जाण्याची देखील माहिती रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राम पाटील यांनी दिली आहे.