जळगाव : प्रतिनिधी
देशात लोकसभा मतमोजणीची धामधूम सुरु असून आज सकाळपासून लोकसभा निवडणूकीच्या निकालात रावेर आणि जळगाव लोकसभेतून महायुतीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आल्याचे पहायला मिळाले. सकाळी ११ वाजता चौथ्या फेरती रक्षा खडसे ह्या ७४ हजार ९१२ मतांनी तर स्मिताताई वाघ ह्या ७१ हजार ८९३ मतांनी आघाडीवर पुढे असल्याचे दिसून आले.
१३ मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर एक्झीट पोलचा निकाला महायुतीच्या बाजूने असल्याचे कल दिसून आला. दरम्यान आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीच्या निकाल जाहीर टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे. आता सकाळी ११ वाजता चौथ्या फेरीत मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे 74,912 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 1,71,587 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील 96, 675 यांना अनुक्रमे इतके मत मिळाले असून रक्षा खडसे आघाडीवर असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिताताई वाघ ह्या 71,893 मतांनी आघाडीवर असून त्यांना 1,54,484 मते मिळाली आहे तर करण पवार यांना 82,591 इतकी मते मिळाली. या निकालावरून महायुतीचे दोन्ही उमेदवार चौथ्या फेरीपर्यंत आघाडीवर असल्याचे पहायला मिळाले.