जळगाव : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशातील प्रत्येक नागरिकांचे लक्ष लागून असून जिल्ह्यातील दोन्ही जागेवर देखील चुरस बघायला मिळाली आहे. आज सुरू झालेल्या मतमोजणीत रावेरमधून रक्षाताई निखील खडसे तर जळगावातून स्मिताताई वाघ यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाल्याचे समोर आले आहे.
आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. पहिल्यांदा टपाली मते मोजण्यात आली. यानंतर ईव्हीएमची मते मोजण्यास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आता सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीचे कल समोर आले आहेत. दरम्यान, आज पहिल्या फेरीत रक्षा खडसे 10,666 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 28249 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील 17583 यांना अनुक्रमे इतके मत मिळाले आहेत.
या माध्यमातून प्राथमिक कल हा रक्षा खडसे यांच्या बाजूने असल्याचे दिसून आले आहे. आता उर्वरित फेर्यांमध्ये नेमके कुणाला मताधिक्य मिळेल यावरून रावेर लोकसभा मतदारसंघातील विजेता ठरणार आहे. तर दुसरीकडे जळगावमधून करण पवार यांना १४,४७७ इतकी मते मिळाली असून स्मिताताई वाघ यांना २०७०२ मते मिळाली आहेत. यातून स्मिता वाघ यांना १५२२५ मतांची आघाडी मिळाली आहे.