वाराणसी : वृत्तसंस्था
देशातील सर्वात हॉट सीटवरील लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काय होणार?
लोकसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काय होणार? याकडे राजकीय विश्लेषकांची नजर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणावरुन तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी सामना झाला.
स्वतंत्र्यानंतर रघुनाथ सिंह तीन वेळा या ठिकाणावरुन खासदार झाले. 1967 मध्ये सीपीएमचे एस. एन.सिंह यांनी त्यांना पराभूत केले. 1971 मध्ये काँग्रेसने विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु प्रो. राजाराम शास्त्री यांनी निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांनी जनसंघचे कमला प्रसाद सिंह यांना पराभूत केले. 1977 मध्ये जेपी लहरमध्ये लोकदलचे चंद्रशेखर खासदार झाले. 1980 मध्ये काँग्रेसचे पंडीत कमलापती त्रिपाठी यांनी राजनारायण यांना पराभूत केले. 1984 मध्ये काँग्रेसचे श्यामलाल यादव, 1989 मध्ये व्ही.पी. सिंह लहरमध्ये जनता दलाचे अनिल शास्त्री विजयी झाले.