जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या दोन जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हयांतील रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार अशोक कोळी याचे विरुध्द दारुबंदी कायदयाअंतर्गत ९ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए प्रस्ताव रामानंदनगर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तयार करुन प्रस्ताव हाएलसीबी, जळगाव येथे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकार, जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.३० रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द आदेश पारीत केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अशोक बाळू कोळी (वय ३६ रा.साईबाबा मंदिर जवळ, समतानगर, जळगाव) याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे आहेत. संपूर्ण कामगिरी रामानंदनगर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहा.पो.निरी. विठ्ठल पाटील, पोहेकों संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी, इरफान मलीक, रेवानंद साळुखे, हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, उमेश पवार अशांनी केली. अशोक कोळी याला मध्यवर्ती कारागृह, मुंबई जि.मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.
एम.पी.डी.ए.प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवालकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पो.निरी.किसन नजनपाटील व त्यांचे अधिनस्त सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनिल पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, रफिक शेख कालु, ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.
अमळनेर पो. स्टे. हद्दीतील शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख याचेविरुध्द विविध प्रकारचे गंभीर २७ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए प्रस्ताव हा अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी तयार करून प्रस्ताव हा एलसीबी, जळगाव येथे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकार, जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.३० रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द आदेश पारीत केला आहे.
शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (वय २४ रा. पिंपळे रोड, संविधान चौक, लाकडी वखारीचे मागे अमळनेर) याच्यावर विविध प्रकारचे भारतीय दंड विधान कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रस्तावासाठी संपूर्ण कामगिरी अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहा.पो.निरी.अजित साळवे, पोहेको किशोर पाटील, पोको चरण पाटील, प्रशांत पाटील, नितीन मनोरे अशांनी १ जून रोजी ताब्यात घेतले. शुभम देशमुख याला मध्यवर्ती कारागृह, ठाणे जि.ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे. एम.पी.डी.ए.प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवालकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पो.निरी.किसन नजनपाटील व त्यांचे अधिनस्त सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख, ईश्वर पाटील अशांनी काम पाहिले आहे.