Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्रीच्या सुमारास सून व्हायची गायब : सासूने पाठलाग करीत केली उकल
    क्राईम

    रात्रीच्या सुमारास सून व्हायची गायब : सासूने पाठलाग करीत केली उकल

    editor deskBy editor deskJune 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातून समोर आली आहे. सासरी राहणाऱ्य़ा भाडेकरूसोबतच सूनेचे प्रेमसंबंध जुळले. जेव्हा महिलेच्या सासूला याबद्दल समजलं तेव्हा तिने सूनेच्या आईला याबाबत माहिती दिली. मात्र, सूनेच्या आईने जे काही उत्तर दिलं, जे ऐकून सगळेच थक्क झाले. सूनेच्या आईने तिच्या सासूलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बिंदू कटरा चौकी परिसरातील आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, सहा वर्षांपूर्वी सदर परिसरात एका मुलीचा विवाह झाला होता. इतक्यात एक तरुण तिच्या सासरच्या घरी भाड्याने खोली घेऊन राहू लागला. आधी सून आणि भाडेकरू यांच्यात मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही. लवकरच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आता सुनेचे तिच्या सासरच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू प्रियकराशी अनैतिक संबंध सुरू झाले होते. सुनेने आपल्या पाच वर्षांच्या निरागस मुलाला दुसऱ्या खोलीत बंद केल्याचा आरोप आहे.

    रात्रीच ती भाडेकरूच्या खोलीत गेली. रात्री सासूला जाग आली तेव्हा सून आपल्या खोलीत नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी सुनेचा शोध सुरू केला. शोध घेत असताना सासू भाडेकरूच्या खोलीजवळ पोहोचली तेव्हा तिला थोडा संशय आला. सासूने दार उघडले असता तिला एकाच खोलीत भाडेकरू आणि तिची सून दिसली. हे दृश्य पाहून सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. सासूने सुनेची तक्रार तिच्या आईकडे केली, मात्र तिने त्याऐवजी सासूलाच खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सासूने सदर पोलीस ठाण्यात केली. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी आता सून, भाडेकरू आणि सुनेच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.