लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । पारोळा शहरासाठी नवीन जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी मंजूर १ कोटीचा निधीतून वेळेत काम सुरू करून निधी खर्च करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा नगरपरिषद क्षेत्रात वाढीव लोकसंख्या पाहता पिण्याच्या पाण्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी सध्या असलेली जलकुंभ व जलशुध्दीकरणाची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. याकरीता शासनाकडून १ कोटी रूपयांची निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे.
पारोळा शहरासाठी लागणारे पिण्याचे पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनीद्वारे पारोळा शहराला पुरविले जाते. धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतांना शहरातील नागरीकांना ८ ते १० दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो. या नवीन जलकुंभ नंतर शहराला किमान एक ते दोन दिवसाआड पाणी पुरवठा सहज शक्य होईल तरी शासनाकडून आलेला १ कोटीचा निधी मार्च २०२२ अखेर पर्यंत खर्च करण्यात यावा अशी मागणी चे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी पारोळा मुख्याधिकारी यांना दिले आहे.