Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रामदेववाडी अपघात प्रकरणातील अटकेतील तिघांना न्यायालयीन कोठडी
    क्राईम

    रामदेववाडी अपघात प्रकरणातील अटकेतील तिघांना न्यायालयीन कोठडी

    userBy userMay 28, 2024Updated:May 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी ।

    जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे झालेल्या अपघातात चार जण ठार झाल्याच्या घटनेत तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आज 27 मे राजी दुपारी 3 वाजता अटकेतील संशयित आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती आर. आय. सोनवणे यांनी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे 7 मे रोजी सायंकाळी 5 वाजता झालेल्या भीषण अपघातात वत्सलाबाई सरदार चव्हाण वय-30, सोमेश सरदार चव्हाण वय 2, सोहम सरदार चव्हाण वय-7 आणि लक्ष्मण भास्कर राठोड वय-12 यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी अखिलेश संजय पवार, अर्णव अभिषेक कौल आणि ध्रुव सोनवणे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने तिघांना  27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तिघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज सोमवारी 27 मे रोजी दुपारी 3 वाजता पुन्हा तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती आर. आय. सोनवणे यांनी तिघांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.