जळगाव प्रतिनिधी ।
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे झालेल्या अपघातात चार जण ठार झाल्याच्या घटनेत तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आज 27 मे राजी दुपारी 3 वाजता अटकेतील संशयित आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती आर. आय. सोनवणे यांनी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे 7 मे रोजी सायंकाळी 5 वाजता झालेल्या भीषण अपघातात वत्सलाबाई सरदार चव्हाण वय-30, सोमेश सरदार चव्हाण वय 2, सोहम सरदार चव्हाण वय-7 आणि लक्ष्मण भास्कर राठोड वय-12 यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी अखिलेश संजय पवार, अर्णव अभिषेक कौल आणि ध्रुव सोनवणे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने तिघांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तिघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज सोमवारी 27 मे रोजी दुपारी 3 वाजता पुन्हा तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती आर. आय. सोनवणे यांनी तिघांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहे.