जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात उन्हाचा पारा 45 वर पोहोचला आहे. त्यामुळे उष्णघातामुळे अनेक जणांचा मृत्यू होत आहे. दरम्यान बेवारस असलेल्या मृतदेह नाका येथील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मृतदेह पुरण्याचे काम सुरू आहे. परंतु हे मृतदेह वरच्यावर पुरले जात असून या ठिकाणी कुत्र्यांचा धुमाकूळ होऊन मृतदेहाची विटंबना होत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज नारखेडे यांच्यासह नागरिकांनी रविवारी 26 मे रोजी दुपारी 2 वाजता आंदोलन करत जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेचा पारा 45° वर पोहोचले आहे. त्यामुळे रस्त्यावर असलेले इतर काही बेवारस नागरिकांचा उष्णघातामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान या उष्णतामुळे मृत्यू झालेल्या बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमी जवळील मोकळ्या जागेत मृतदेह पुरले जात आहे. परंतु हे मृतदेह वरच्यावर पुरले जात असल्या कारणामुळे कुत्र्यांचा धुमाकूळ घालत असून मृतदेहाची विटंबना होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. दरम्यान या अनुषंगाने रविवारी 26 मे रोजी दुपारी 2 वाजता स्थानिक नागरिकांनी आंदोलन करत जिल्हा प्रशासन यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करून इतर मोकळ्या जागेत या बेवारस मृतदेहांची पुरण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.