जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शेळगाव बॅरेज या धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, असे मागणी जळगाव तालुक्यातील धामणगाव, नांद्रा, इदगाव, खापरखेडा आवार, विदुर, डीकसाई, ममुराबाद गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील त्यांच्या निवासस्थानी शनिवारी २५ मे रोजी दुपारी २ वाजता भेट घेऊन आवर्तन सोडण्याबाबत चर्चा केली.
यावेळी सकारात्मक चर्चा होऊन पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवर्तन सोडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेळगाव बॅरेजमधून रविवारी २६ मे रोजी सकाळी ७ आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
यावेळी पंचायत समिती सभापती जनार्दन आप्पा, नाना पाटील, संजय भालेराव, विजय भालेराव, पंढरी भालेराव, शांताराम पाटील, प्रल्हाद पाटील, रघुनाथ महाजन, शिवाजी सपकाळे, दगडू पाटील, प्रमोद पाटील, भास्कर भालेराव, रमेश पाटील,
संजय पाटील, बाळकृष्ण पाटील, महेश चौधरी संतोष पाटील यांच्यासह या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. यावेळी आवर्तन सुटल्यानंतर शेतकऱ्यांसाठी पिकांसाठी पाणी आणि जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.