• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गणेश कॉलनीतील तरूणाची राहत्या गळफास घेवून आत्महत्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
May 20, 2024
in क्राईम, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी : शहरातील गणेश कॉलनीत राहणाऱ्या एका तरूणाने राहत्या घरात छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवार २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  सनी ईश्वरलाल केसवानी (वय ३६, रा.गणेश नगर, जळगाव)असे मयत उद्योजकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सनी ईश्वरलाल केसवानी हा तरूण आपल्या कुटुंबासह गणेश कॉलनी परिसरात वास्तव्याला होता. जळगाव एमआयडीसी येथे त्याची स्वतःची कंपनी आहे. त्यानुसार तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. सनी केसवानी यांची पत्नी माहेरी गेली होती. सोमवारी २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी तो एकटाच होता. यावेळी त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान शेजारच्या नागरिकांना माहिती समजताच त्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  सनी केसवानी यांना तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल दुगड यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्नात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा  परिवार आहे. तरुण उद्योजकाच्या मृत्यूमुळे शासकीय रुग्णालयात अनेक व्यापारी, उद्योजकांनी गर्दी केली होती.

Previous Post

धावत्या रेल्वेचा धक्क्याने कडगाव येथील महिला जागीच ठार

Next Post

जळगाव जिल्हा हादरला; जुन्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून

Next Post

जळगाव जिल्हा हादरला; जुन्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group