कमी वेळेत सूक्ष्म नियोजनाचे उत्तम उदाहरण ठरली लोकसभा निवडणूक
भारतीय जनता पार्टीमध्ये नियोजनात “परफेक्ट” असलेला पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याची व्यक्त होत आहे चर्चा
जळगाव : देशाची सर्वोच्च निवडणूक म्हणजेच लोकसभा निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय वारे वाहू लागले होते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने तात्कालीन खासदार उन्मेश पाटील व युवा चेहरा व नियोजनात ज्यांचा हातखंड आहे असे पारोळा नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांनी विचारकरून अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. प्रवेश होण्याचे चर्चा सुरू असताना सर्वांनी गृहीत धरले होते की ही उमेदवारी उन्मेश पाटील किंवा त्यांच्या परिवारात दिल्या जाईल परंतु घडले नेमके उलटेच या ठिकाणी उमेदवारी ही करण बाळासाहेब पाटील पवार यांना जाहीर करून शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामार्फत मोठी गुगली टाकण्यात आली.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून सर्वत्र चर्चा होती की ही निवडणूक एकतर्फे होऊन भारतीय जनता पार्टीचा सहज विजय होईल. परंतु आता मतदान उलटून चार दिवस झाले असून चर्चा एकच होत आहे ती म्हणजे करण बाळासाहेब पाटील पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, शेकाप इ. पक्षांना सोबत घेऊन एकीची मोट बांधून अतिशय काटेकोर नियोजनाने ही निवडणूक कमी कालावधीत विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवल्याची चर्चा होत आहे.
करण पवारांचा निवडणूक नियोजनात हातखंड….
करण बाळासाहेब पाटील पवार हे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष जरी असले तरी त्यांनी यापूर्वी मोठ्या निवडणुकींमध्ये नियोजनाचे सूत्र हातात घेऊन खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण व जळगाव महापालिकेतील नगरसेवक निवडण्यात फार मोठी भूमिका निभवली होती. याच गोष्टीचा अनुभव महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी वेळी अनुभवायाला मिळाला. उमेदवारी जाहीर झाल्यापासून सर्वत्र धावपळ सुरू असताना आपल्या नियोजनबद्ध कारभाराने उमेदवारी अर्ज भरण्यापासून, उद्धव ठाकरे साहेबांची सभा ते मतदानाच्या दिवशीचे बूथनियोजनापर्यंत एक टीमवर्कने करण पवारांनी वेगवेगळे यंत्रणा कामाला लावून ही निवडणूक कशा पद्धतीने लढावी याच उत्कृट मॉडेल महाविकास आघाडी मध्ये निर्माण केला आहे. तसेच पूर्ण लोकसभा मतदारसंघात असलेले नातेवाईक मंडळी यांनी देखील मोठा उत्साहाने निवडणूक कालावधीत धुरा सांभाळल्या.
मित्रांची फौज खंबीरपणे होती सोबत…
करण बाळासाहेब पाटील पवार यांची उमेदवारी जाहीर झाली त्या क्षणापासून त्यांचे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नव्हेच तर पूर्ण राज्यभरात पसरलेले मित्रांची फौज दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यात पोहोचून आपापल्या कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्या ठिकाणी सक्रिय झाली. या ठिकाणी विशेषता उत्तर महाराष्ट्रातून नाशिक,धुळे,पारोळा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अंमळनेर, जळगाव शहर, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, येथील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महत्त्वाच्या भूमिका निवडणुकीत निभावली. एकच वेळी नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार मतदार संघात कार्यरत होती 3000 मित्रांची फौज. याव्यतिरिक्त ज्यांना कुणाला करण पाटील यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कुठलाही सहकार्य केला असेल त्यांनी देखील याच्यात भर पाडून प्रचाराची मोठी यंत्रणा उभारण्यात मोलाचे सहकार्य केले.
भारतीय जनता पार्टीच्या बैठकांमध्ये करण पवारांनी निवडणुकीत केलेल्या नियोजनाची चर्चा….
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर संघटनेत मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत होते. याचाच फायदा भारतीय जनता पार्टीला होईल असा खोटा आशावाद नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बाळगला होता. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवारी करण बाळासाहेब पाटील पवार यांना जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विधानसभा मतदारसंघ व तालुका निहाय गुढीपाडवा,ईद, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रभू श्रीराम नवमी, हनुमान जयंतीचे पॅम्प्लेट प्रत्येक गाव पातळीवर पोहोच करून वितरणाचे नियोजन, प्रचार, कॉर्नर बैठका, घरोघरी भेटी,मशाल रॅली, बाईक रॅली, याचे झालेले काटे करून नियोजन पाहून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नियोजनात हातखंडा असलेला पदाधिकारी व कार्यकर्ता गमावल्याची चर्चा उघडपणे होत आहे.