जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील पाण्याच्या टाकीच्या आवारात असलेल्या खुल्या भूखंडावर जैन इरिगेशन, गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यासह लोकसहभागातून वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची उपस्थिती होती.
लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी यावेळी उपस्थितांना केले. याप्रसंगी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, सदस्य सविता नंदनवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे अतिन त्यागी, अनिल जोशी, उद्योजक सुबोध चौधरी, राधेशाम मणियार, तांबापुरा फाऊंडेशनचे अध्यक्ष मतिन पटेल, अमन फाऊंडेशनचे शाहिद सय्यद यांच्यासह परिसरातील दिपक मांडोळे, संदीप मांडोळे, अनिल घुले, दिपक संनसे, विक्की कचरे, यशवंत सपकाळे, सुमित देशमुख यांच्यासह रहिवासी उपस्थितीत होते. मान्यवरांसह नागरिकांनी मिळुन २५० देशी जातीच्या वृक्षाच्या रोपांची लागवड केली. यामध्ये बेहडा, करंज, पिंपळ, बुच, रिटा, वड, चिंच, पेल्टोफाॕर्म, बकूळ, निंब, बेल, पारिजातक, कांचन, जांभूळ, पिंपळ बेंड, स्पॕथोलिया, गुलमोहर, सुरू, विलायती चिंच यांचा समावेश आहे.
यावेळी विवेक होशिंग यांनी स्थानिक वृक्षांचे महत्त्व सांगत वृक्षसंवर्धनाची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. अतिन त्यागी यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावुन सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक, जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी, मराठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.


