मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईत काल दुपारी 3 वाजेपर्यंत ऊन आणि मोकळं आभाळ असलेलं वातावरण होतं. पण अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसापेक्षा वारे प्रचंड वेगाने वाहू लागले. या वाऱ्याचा वेळ तासी 40 ते 50 किमी असा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
दरम्यान मुंबईतील दोन ठिकाणी तर मोठमोठ्या होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्या. आधी वडाळा येथील श्री जी टॉवरजवळ होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय. अतिशय चित्तथरारक अशी ही घटना आहे. या घटनेत कुणी जखमी झालं आहे का, कितपत नुकसान झालंय, याबाबतची सविस्तर मााहिती अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेनंतर घाटकोपमध्येदेखील अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग हे पेट्रोल पंपावर कोसळलं.
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना खूप मोठी आहे. कारण पाऊस आणि वादळी वारा यामुळे अनेकांनी पेट्रोल पंपाच्या छताखाली जाण्याचा विचार केला. त्यामुळे अनेकजण स्वत:ला पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी पेट्रोल पंपाच्या छताखाली गेले होते. तर दुसरीकडे अनेक वाहनं पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपवर आल्या होत्या. या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे पट्रोल पंपाच्या बाजूला लावण्यात आलेलं भलंमोठं होर्डिंग हे थेट पेट्रोल पंपावर कोसळलं. यामुळे मोठा हाहा:कार उडाला. घाटकोपरमधील छेडानगर परिसरात ही घटना घडली. घटना घडताच मोठी तारांबळ उडाली. अनेकांनी अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. घटनेचं गांभीर्य ओळखून एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी तातडीने पाचरण करण्यात आलं आहे.
बचावकार्य सुरू असून होर्डिंगखाली अजुन काही अडकले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण माहिती घेतली. यावेळी, या घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रूपयांच्या मदतीची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
घटना अतिशय दुर्देवी आहे. अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या आहेत. जवळपास 57 लोकांना बाहेर काढलं आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व रेस्क्यू टीम काम करत आहे. नागरिकांना आधी बाहेर काढलं जाईल. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. होर्डिंगविषयी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. अनधिकृत होर्डिंगवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या दुर्घटनेत मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांच्या मदत केली जाईल. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी मोठं नुकसान केलं होतं. आज सोमवारी राजधानी मुंबमध्ये दुपारच्या सुमारास धुळीचं वादळ आलं. त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं. मात्र घाटकोपर येखील रमाबाईनगरमधील पेट्रोल पंपावर पावसामुळे अनेक लोकं थांबली होतीत. पाऊस सुरू असतानाच त्या ठिकाणी असलेलं होर्डिंग पंपावर पडलं. संपूर्ण पंप होर्डिंगखाली झाकला गेला होता. त्यासोबतच तिथे असलेले लोकंही या खाली अडकले.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेच्या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. होर्डिंगखाली अद्यापही 50 ते 60 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे. घाटकोपरमध्येच नाहीतर वडाळ या ठिकाणीसुद्धा एक होर्डिंग कोसळलं होतं.
पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी या पेट्रोल पंपावर असतानाच अचानक हे भले मोठे जाहीरातीचे होर्डींग कोसळल्याने अनेक जण या ढीगाऱ्याखाली वाहनांसकट अडकले. पावसाने आडोशाला उभे असलेले नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या अपघातानंतर येथील ढीगाऱ्यातून 37 जणांना बाहेर काढले आहे. आणखी 50 ते 60 जण ढीगाऱ्याच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या पथकांना मदतीला बोलावले आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आदेश जारी केले आहे. अपघातग्रस्तांना आवश्यक मदत मिळावी यासाठी उपाययोजना करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी स्वत: महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
जाहिरातीचा बोर्ड कोसळला आहे. लोखंडी आणि सळया क्रेनच्या सहाय्याने उचलाव्या लागणार आहेत. पेट्रोल पंप असल्याने येथे लोखंड कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करता येणार नाही. पेट्रोल पंपामुळे होर्डिंग हटवण्याच्या कामात मोठी अडचण होत आहे. या दुर्घटनेच्या बचावा मोहीमेवर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी डीझास्टर कंट्रोल रुममधून घटनेवर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट दिली आहे. अनेक नागरिक आत अडकले असल्याचा अंदाज आहे. आजची रात्र बचावकार्यात जाणार आहे. पालिकेने मोठमोठ्या क्रेन आणल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ टीम, पोलीस तसेच 20 ते 25 अॅम्ब्युलन्स दाखल झाल्या आहेत. रात्रभर मोहीम चालणार आहे.