• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रात्री शेतातच प्रसूती; वैद्यकीय पथकाने महिलेसह जुळ्या बाळांनाही वाचविले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 9, 2022
in आरोग्य, जळगाव
0
रात्री शेतातच प्रसूती; वैद्यकीय पथकाने महिलेसह जुळ्या बाळांनाही वाचविले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : काळ आला होता पण वेळ आली नव्हती…शेतात असताना अचानक गर्भवती महिलेला कळा सुरु…ग्रामीण भाग असल्याने कुटुंबीयांची धावपळ…मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती सुरु…महिलेच्या वेदनांनी आसमंत हादरले…रात्रीची बिकट वेळ…महिलेने चक्क जुळ्या बाळांना दिला जन्म… त्याचवेळी बाळांचेही शिशुरूदन सुरू…पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगातून अतिरक्तस्राव होऊनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या अथक परिश्रमानंतर तिचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

केवलबाई साहिदास भिल (वय २६, रा.उखडवाडी ता. धरणगाव) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे कुटुंब मजुरी करते. या महिलेची प्रसूतीची हि चक्क पाचवी वेळ होती. यापूर्वी २ मुली व २ मुले तिला आहेत. पाचव्या प्रसूतीमध्ये तिला दोन्ही मुली झाल्या आहेत. ५ जानेवारी रोजी कुटुंबियांसह शेतात असताना केवलबाईला प्रसूतीकळा सुरु झाल्या. कुटुंब हालचाल करून वाहन आणतील तत्पूर्वीच महिलेची प्रसूती सुरु झाली.

शेतातच सदर महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र प्रसूतीमुळे महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होऊन बेशुद्ध झाली. कुटुंबीयांनी थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिला रात्री ९ वाजेच्या सुमारास दाखल केले. महिलेचे हृदयाचे ठोकेदेखील लागत नव्हते. खूप रक्तस्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक होती. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जितेंद्र कोळी, डॉ. कांचन चव्हाण यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव वाचविण्यासाठी गर्भपिशवी काढली. यामुळे महिलेचा जीव वाचला.

महिलेला ६ रक्ताच्या पिशव्या आणि २ पांढऱ्या पेशींच्या थैल्या लावण्यात आल्या. चार दिवस अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर रविवारी जनरल कक्षात या महिलेला वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवले आहे. समयसूचकता ठेवून महिलेचा जीव वाचविणाऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी कौतुक केले आहे. उपचार करण्याकामी डॉ. शलाका पाटील, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. चंदन महाजन, डॉ. राजश्री येसगे, डॉ. विनेश पावरा, बधिरीकरण विभागाचे डॉ. हर्षद, डॉ. स्वप्नील इंकने, शस्त्रक्रियागृह इन्चार्ज परिचारिका सोनाली पाटील, अतिदक्षता विभागाच्या इन्चार्ज परिचारिका राजश्री आढाळे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

कोरोनाचा स्फोट : जळगाव जिल्ह्यात आज नव्याने १७९ रूग्ण आढळले

Next Post

शिरसोली रोडवरील सुरभी लान्स येथे जेसीआय सेंट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Next Post
शिरसोली रोडवरील सुरभी लान्स येथे जेसीआय सेंट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात

शिरसोली रोडवरील सुरभी लान्स येथे जेसीआय सेंट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group