जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ३३ वर्षीय विवाहितेला तिच्या मुलांना मारण्याची धमकी देत भुसावळ शहरातील सुरभी लॉज येथे एकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी, १ मे रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आला आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ १२ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान या महिलेला तिच्या मुलांना रेल्वे पटरीवर फेकून जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी विनोद इंगळे (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) याने महिलेवर भुसावळ शहरातील सुरभी लॉज आणि खडका चौफुली येथे वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. तपास उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.