लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील चित्रा चौकात बाजारात आलेल्या शेतकऱ्यांची दुचाकी चोरून नेलचा प्रकार शनिवारी समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, प्रदीप शामराव देशमुख (वय-६१) रा. हरी ओम नगर, जुना कानळदारोड, शिवाजी नगर हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीटी २११९) क्रमांकाची दुचाकी आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास प्रदीप देशमुख हे चौत्रा चौकात दुचाकीने कामानिमित्त आले. चौकातील विशाल ईलेक्ट्रिक दुकानासमोर पार्किंग करून लावली होती. अवघ्या १० मिनीटात अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी पार्किंगच्या ठिकाणाहून चोरून नेली. प्रदीप देशमुख यांनी दुचाकीचा शोध घेतला परंतू आढळून आली नाही. याप्रकरणी शनिवारी ८ जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. योगेश पाटील करीत आहे.