लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। पुणे शहरातील कोथरूड पोलीस ठाण्याचे ७० जणांचे पथक आज जळगावात दाखल झाले आहे. मविप्रचे अॅड. विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या आता अडचणी वाढण्याच्या शक्यता वर्तविण्यात आले आहे. ७० जणांचे एकुण पाच पथकाची निर्मिती केली असून कसून चौकशी सुरू आहेत.
आज जळगाव शहरातील निलेश रणजित भोईट, तानाजी केशवराव भोईटे, महेंद्र वसंत भोईट, प्रा. एल.पी. देशमुख आणि प्रमोद काळे अश्या पाच जणांच्या घरी पोलीसांनी धाडी टाकून सकाळपासून चौकशी सुरू आहेत. दरम्यान मविप्र वादात भोईट गटाला मदत करून आ. गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणी अखेर कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले आहे. पुणे पोलिसांच्या पथकात सुमारे ७० पोलिसांचा समावेश असल्याची माहिती आहे. जळगावात एकाच वेळी ५ ठिकाणी पुणे पोलिसांची छापेमारी असल्याचं कळतंय. जळगावातील अॅड. विजय पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी छापेमारी केल्याची चर्चा सुरु आहे.
जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादात दाखल गुन्ह्यावरून हे छापे टाकण्यात आल्याचं कळतंय. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाबाबत माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला आहे. अॅड. विजय पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.