जळगाव : प्रतिनिधी
शहरातील फॉरेस्ट कॉलनी येथील प्राईम रिडींग लायब्ररी येथून विद्यार्थ्यांची लॅपटॉप, बँग आणि रोकड असा एकुण ३३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवार दि. ७ मे रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील भोईटे नगरातील अमर प्लाझा येथे चेतन दिलीप बागुले (वय २३) हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. चेतन हा सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तो रोज फॉरेस्ट कॉलनीतील प्राईम रिडींग लायब्ररीत रिडींगसाठी येत असतो. नेहमीप्रमाणे मंगळवार दि. ७ मे रोजी सायंकाळी तो लायब्ररीत आलेला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची बँग त्या लॉपटॉप, आणि रोकड ठेवलेली पाकीट असा एकुण ३३ हजार ५०० रूपये किंतमीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. बॅगची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे हे करीत आहे.