• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकनाथ खडसेंना, गिरीश महाजनांचे खुले चॅलेंज !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 8, 2022
in जळगाव, राजकारण
0
एकनाथ खडसेंना, गिरीश महाजनांचे खुले चॅलेंज !

जामनेर प्रतिनिधी | ”ईडीच्या धाकाने एकनाथ खडसे हे चार वेळा कोरोना बाधीत झाले.अपंगाचे खोटे प्रमाणपत्र काय काढले,त्या प्रकरणी दिव्यांग बांधवांनी त्या विरूध्द आंदोलने केली.आता ते मोक्काच्या धाकाने आपल्याला कोरोना झाल्याचे म्हणत असले तर त्यांना खरोखर ठाण्याच्या उपचाराची गरज आहे”,असा पलटवार माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर केला आहे. तर ”राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिध्द करावी, अथवा याबाबत तक्रार करावी” असे खुले चॅलेंज देखील त्यांनी केले आहे.
 
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाचे नेते आ. गिरीश महाजन यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर मोक्काच्या धाकाने त्यांना कोरोना झाला असावा असा संशय व्यक्त केल्याने आ.महाजन यांनी खडसेंच्या प्रतिक्रीयेचा समाचार घेतला आहे. यावरून त्यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

या संदर्भात आ. गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे स्वत: ईडीच्या उंबरठ्यावर आहे,सात महिन्यापासून जावई जेलमध्ये आहे.आता कोण आत जाते आणि कोण बाहेर जाते हे काळच ठरविणार आहे.मला कोरोना झाला याचे खडसेंनी फार बाऊ करून घेण्याची गरज नाही. माझ्यावर मोक्का लावण्यासाठी व खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांवर दबाव काय आणता हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे.स्वत: खडसे ईडीच्या घेर्‍यात आहे त्यांनी मला शिकविण्याची आता गरज राहीली नाही.त्यांना खरोखर आता ठाण्यात उपचार घेण्याची गरज असल्याचे आ.गिरीष महाजन म्हणाले.

दरम्यान, आमदार महाजन म्हणाले की, राज्यात एकनाथराव खडसे यांच्या पक्षाची सत्ता आहे. मी माझ्या कोरोनाची चाचणी याच सरकारच्या लॅबमधून केलेली आहे. यात त्यांना काही शंका असेल तर त्यांनी आपल्याच सरकारच्या लॅबमधील रिपोर्टबाबत तक्रार करावी, अथवा याच्या सत्यतेची चौकशी करावी असा सल्ला देखील आ. गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिला आहे.

Previous Post

पाळधी खुर्द व बुद्रुकच्या पाणी पुरवठा योजनेचे लवकरच भूमिपुजन : ना. गुलाबराव पाटील

Next Post

मविप्र वाद : आ. गिरीष महाजनांवर संकटाची कुऱ्हाड; कोथरूड पोलीसांची जळगावत पाच ठिकाणी छापेमारी

Next Post
मविप्र वाद : आ. गिरीष महाजनांवर संकटाची कुऱ्हाड; कोथरूड पोलीसांची जळगावत पाच ठिकाणी छापेमारी

मविप्र वाद : आ. गिरीष महाजनांवर संकटाची कुऱ्हाड; कोथरूड पोलीसांची जळगावत पाच ठिकाणी छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group