विजय पाटील जळगाव । प्रतिनिधी । एरंडोल तालुक्याचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील हे मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरणात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.
सन १९७८ साली महेंद्रसिंग पाटील हे जनता पक्षाकडून निवडणूक लढवून एरंडोल आणि पारोळा तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर ते केवळ १८ महिने आमदार राहिले. त्यानंतर १९९५ मध्ये जनता दल पक्षातून पुन्हा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही.जी.तात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाल महेंद्रसिंग पाटील यांच्यासह पाचोऱ्याचे माजी आमदार ओंकार आप्पा पाटील आणि अमळनेरचे माजी आमदार गुलाबबापू पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते जळगाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
दरम्यान, सध्या लोकसभेच्या निवडणूकीचे रणधुमाळी सुरू असतांना माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्पाची उंची वाढविणे, पद्मालय प्रकल्प मार्गी लावण्याबाबत साकारात्मक चर्चा करण्यात आली. व काम होण्याबाबत आश्वासन मिळाल्यानंतर ते मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता एरंडोल आणि पारोळा तालुक्याचे वातावरण बदलण्याचे संकेत मिळाले आहे. पुढील काळात ते पुन्हा राजकरणात सक्रीय सहभाग घेणाार आहे की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.