• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उसनवारीच्या पैश्याचा वाद : तरुणाने केला वृद्धाचा खून

editor desk by editor desk
May 9, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
उसनवारीच्या पैश्याचा वाद : तरुणाने केला वृद्धाचा खून

जळगाव : प्रतिनिधी

उसनवारी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून व काहीतरी जादूटोणा केल्याच्या संशयावरून भडगाव पेठ येथील ७८ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना वरखेड (ता. भडगाव) येथे घटना घडली. संशयित आरोपीला पाच तासांतच जळगावच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सूपडू नाना पाटील (७८) हे परिसरात भगत म्हणून ओळखले जात. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी लोकांचे येणे-जाणे होते. पेठ भागातील हितेश ऊर्फ कुणाल चुडामण मराठे (२४) हासुद्धा नेहमी येत असे. त्याच्यासोबत सर्वांची ओळख होती. कुणाल यास सुपडू यांनी मार्च महिन्यात उसनवारीने एक महिन्याच्या बोलीवर १ लाख रुपये दिले होते. मात्र. त्याने ते परत केले नाहीत त्यामुळे मंगळवारी दुपारी सुपडू यांनी कुणाल यास फोन लावून पैशांची मागणी केली. त्याने पैसे परत देण्याच्या कारणावरून अरेरावी केली होती. सुपडू हे सायंकाळी ७:३० वाजेनंतर नेहमीप्रमाणे जेवण करून पेठ चौफुलीवर फिरण्यासाठी गेले होते. मात्र, रात्रभर घरीच आले नाहीत. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह वरखेड गावाजवळ असलेल्या खदानीत दिसून आला. त्यांच्या डोक्यातून रक्त आले होते. शर्टही रक्ताने भरला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुपडू हे मंगळवारी सायंकाळी कुणाल याच्यासोबत होते. त्यामळे पोलिसांनी याबाबत हितेश ऊर्फ कुणाल मराठे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उसनवारीने दिलेले पैसे परत देण्याच्या कारणावरून व त्यांनी आपल्याविरुद्ध जादूटोणा केल्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली दिली.

याप्रकरणी कुणाल यास जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव आदी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवार्ड केली.

Previous Post

भागीदाराकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळणार !

Next Post

परिवार गच्चीवर झोपले ; चोरट्यांनी केली घरफोडी

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

परिवार गच्चीवर झोपले ; चोरट्यांनी केली घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group