Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव नामकरण वैध
    राजकारण

    छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव नामकरण वैध

    editor deskBy editor deskMay 8, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नाही, असं म्हटले आहे.

    काही दिवसापूर्वी राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव केले होते. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर नाही असं न्यायालयाने म्हटले आहे.

    या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी सुनावणी घेतली होती. 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुनावणीनंतर न्यायाधीशांनी आपला निकाल राखीव ठेवला होता. यासंबंधीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. माननीय न्यायालयाने ही याचिका फेटाळताना या निर्णयामुळे कोणालाही फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारच्या वतीने महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भागाला उस्मानाबाद आणि औरंगाबाद यांचे अनुक्रमे धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे कोणालाही फरक पडणार नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. यासोबतच न्यायालयाने दाखल करण्यात आलेली याचिका देखील फेटाळली आहे. मात्र ही याचिका फेटाळताना न्यायालयाने कोणताही आर्थिक दंड लावणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

    औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देखील त्याला मंजुरी देण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे जिल्ह्याचे नामकरण केले. त्याला केंद्र सरकारने देखील मंजुरी दिली. तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. आता या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची संमती मिळाल्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मानला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.