भुसावळ : प्रतिनिधी
मतदार संघाच्या वाढत्या तपामानाप्रमाने रावेर लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापत आहे. राजकारणात नवखे असलेल्या श्रीराम पाटलांनी मुरब्बी खडसे कुटुंबीयांची प्रचारात चांगलीच दम शाक होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून ज्यांना खडसे अगदी खालच्या स्तरावर येऊन बोलत होते त्याच देवेंद्र फडविसांची तातडीची सभा खडसेंना तारण्यासाठी भुसावळ मध्ये घेण्यात आली. एकूणच सभा मोठी दिसावी यासाठी शहरातील मोठे मैदान घेण्याऐवजी एका लहान चौकात सभेचे आयोजन करण्यात आले. त्यातही देवेंद्रजी येईस्तोवर लोकांची जुळवाजुळव करणे सुरू होते.
तब्बल वीस हजार लोक येणार अशा वल्गना केल्या गेल्या परंतु प्रत्यक्षात मात्र दीड ते दोन हजार लोक आले असे दिसून येते. असो पण देवेंद्र आले ते खडसे प्रेमापोटी नव्हे तर पक्ष कार्यासाठी त्यांना जर इतकेच खडसे निवडून यावे असे वाटत असते तर त्यांनी संकटमोचकांना रावेरमध्ये अधिकचे लक्ष घालण्याच्या सूचना केल्या असत्या. केवळ सोपस्कार म्हणून ते येवून गेले नसते. १२ खात्यांचे मंत्री असताना खडसे मुख्यमंत्र्यांना शांत बसवीत संपूर्ण मंत्री मंडळाची सभा हातात घेत असत आणि भर मंत्री मंडळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकेरी नावाने उल्लेख करीत. कधी तर मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये उभे राहून अर्वाच्य आणि शिवराळ भाषेत फडणवीसां बाबत टिप्पणी करीत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री पद गेल्यावर खडसेंनी थेट सरसंघचालकांबाबत टिप्पणी केली होती.
सुरुवातीला मुख्यमंत्री पद गेले म्हणून आणि नंतर घोटाळ्यांमुळे मंत्री पद गेले म्हणून. खडसेंचे क्रमांक एकचे शत्रू म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि क्रमांक दोनचे शत्रू म्हणजे गिरीश महाजन. असो पण पक्षादेश म्हणून देवेंद्रजी आणि गिरीश महाजन भुसावळ शहरात आले सभा आणि बैठका घेतल्या आणि गेले. या दोघांनाही माहित आहे की जर रक्षा खडसे निवडून आल्या तर त्याचे श्रेय केवळ एकनाथ खडासेच घेणार आणि पुढे हेच खडसे पुन्हा तुतारी हातात घेत फडणवीस आणि महाजन यांच्या विरोधात रणशिंग फुंकणार. अशा या खडसेंची राजकीय सेटलमेंट फडणवीसांना कशी आवडेल. जे खडसे कधी जातीवरून तर कधी वैयक्तिक कारणावरून फडविस महाजनांना बदाम करीत होते त्यांचे अस्तित्व कसे संपेल याची खलबते करीत होते अशा खडसेंच्या सूनबाई जिंकाव्या असे फडणवीस महाजनांना तरी चालणार नाही. केवळ औपचारिकता म्हणून ही लोक येतील परंतु प्रचार करणार नाहीत कारण समोरचा व्यक्ती जर आपल्याला संपविण्यासाठी अतुर आहे असे माहित असल्यास कोणीच त्या व्यक्तीची मदत मनापासून करणार नाही. असो म्हणूनच खरंच फडणवीसांना खडासेंच्या सुनबाई जिंकव्या असे मनापासून वाटते का ?हा प्रश्न पडतो.