• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कार चारवेळा उलटली : मुख्याध्यापिकेचा उपचारादरम्यान मृत्यू !

editor desk by editor desk
May 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
कार चारवेळा उलटली : मुख्याध्यापिकेचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील वडजी गावाजवळ भीषण अपघात जखमी झालेल्या खुबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता सतीश साळुंखे (वय ४८, रा. इंद्रप्रस्थ नगर, दूध फेडरेशन रोड) यांचा रविवार दि. ५ मे रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मयत झालेल्या ललिता साळुंखे यांचे पती सतीश साळुंखे हे वर्षभरापूर्वी खुबचंद सागरमल याच शाळेतून सेवानिवृत्त झाले. तर मुलगा बंगळुरू व मुलगी पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ललिता साळुंखे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दि. १ मे रोजी मुलगी संजना हिच्यासह भडगाव येथे कारने जात होते. त्या वेळी वडजी गावाजवळ रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तीन ते चार वेळा उलटली आणि झाडावर जाऊन आदळली.

या अपघातात ललिता साळुंखे या जबर जखमी झाल्याने त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर मुलगी संजना ही किरकोळ जखमी झाली. चार दिवस ललिता यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना रविवार दि. ५ मे रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. शिक्षण क्षेत्रातील मंडळींना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

वाहनाच्या समोरासमोर धडक ; दुचाकीस्वार युवक ठार !

Next Post

…तर यंदा यांना तडीपार करावेच लागेल !

Next Post
…तर यंदा यांना तडीपार करावेच लागेल !

...तर यंदा यांना तडीपार करावेच लागेल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group