Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाहनाच्या समोरासमोर धडक ; दुचाकीस्वार युवक ठार !
    एरंडोल

    वाहनाच्या समोरासमोर धडक ; दुचाकीस्वार युवक ठार !

    editor deskBy editor deskMay 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    शहरातील म्हसावद रस्त्यावर श्रीकृपा जिनिंगजवळ चारचाकी गाडी, ट्रक, अॅपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील (मूळगाव सामनेर, ह. मु, ठाकरे कॉलनी, पाचोरा) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.

    मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलहून म्हसावदकडे जाणाऱ्या ट्रकला (आरजे १०/ जीबी ८५२८) दुचाकी ओव्हरटेक करत होती. त्याचवेळा समोरून येणाऱ्या रिक्षाला (एमएच १९ व्ही १२६७) इरटीका (एमएच १८ बीसी१४०८) ओव्हरटेक करत होती. ही ओव्हरटेक करणारी दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात वाहनांची धडक होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच ठार झाला.

    यावेळी गणेश पाटील (खेडी), राजू भावसार (एरंडोल), विठ्ठल वंजारी (एरंडोल) तसेच उमरजे येथील काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व सहकारी घटनेची माहिती मिळताच तत्परतेने अपघातस्थळी दाखल झाले. मयत युवक सुशिक्षित बेरोजगार असून, रोजगारासाठी जळगाव येथे मुलाखत देऊन घराकडे परत जात होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.