लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथे ‘तालुका मुख्याध्यापक संघ’ यांच्याकडून ‘तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले होते या स्पर्धेत म्हसावद येथील थेपडे विद्यालयातील विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे.
‘तालुका मुख्याध्यापक संघ’ यांच्याकडून जळगाव येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत म्हसावद येथील स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धेच्या दुसऱ्या गटात इयत्ता दहावीतील सेजल संजय झवर हिने द्वितीय तर उच्च माध्यमिक विभागातील तिसऱ्या गटात बारावीतील प्रतिभा ज्ञानेश्वर पाटीलने प्रथम तर प्रियंका ज्ञानेश्वर मराठेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
सर्व विजयी स्पर्धकांचे संस्थेचे चेअरमन डॉ.केदार थेपडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोनार, उपमुख्याध्यापक श्री.बच्छाव, पर्यवेक्षक श्री.भंगाळे, ज्यू.कॉलेजमधून श्री.चिंचोरे व संपूर्ण शालेय परीवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे. यात प्रतिभा पाटील या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना विद्या चव्हाण , संजय पवार, योगराज चिंचोरे, निलेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.