जळगाव : प्रतिनिधी
पुणे ते रावेर ही बस शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अजिंठा घाटातील फॉरेस्ट गेटसमोरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या बसमध्ये ६६ प्रवासी होते. त्यातील ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात जामनेरच्या चौघांचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर आगारातील बस क्रमांक एम.एच. ४० वाय. ५१९७ ही बस फॉरेस्ट गेट समोरून बस जात असताना चालक योगेश तायडे यांचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे धावती बस रस्त्याच्या पलीकडे जाऊन ७ फूट खाली जाऊन पलटी झाली.
या बसमध्ये एकण ६६ प्रवासी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात सुशीलाबाई दिनकर निर्खे (वय ७०) रा. जामनेर, सरुबार्ड शामराव पाटील (वय ६५) ६५) रा. सोयगाव, निखिल किरण पाटील (वय १३) श्रीरामपूर, सुमित्रा दिनकर निखें (वय ४८) रा. जामनेर, विजय हरी सूर्यवंशी (वय ७२) रा. जामनेर, संध्या वसंतराव पठारे (वय ६३) रा. सोयगाव, जयमाला विजय सूर्यवंशी (वय ७०) रा. जामनेर, ज्योती साईचंद्र बासनेवल (वय ४०) रा. छत्रपती संभाजीनगर हे अपघातात जखमी झाले आहेत