जळगाव : विजय पाटील
रावेर लोकसभा मतदार संघातील मुक्ताईनगरची जबाबदारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्याकडे देण्यात आली आहे. आज मुक्ताईनगरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा असून मुक्ताईनगर येथील नियोजित सभास्थनाचे छायाचित्र काही तरी वेगळाच संदेश देत आहेत. इथे लावलेल्या एकही बॅनरवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे नाव व छायाचित्र नाही. वहिनी रक्षा खडसे यांना भा.ज. पा. चे तिकीट जाहीर झाल्यावर व वडील एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तोंडी राजीनामा दिल्यानंतर आपण पवार साहेबांसोबतच राहू अशी भूमिका रोहिणी ताईंनी घेत लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा प्रचार जोमाने करू असे वक्तव्य केले होते. आणि तसा त्यांनी प्रचार सुरूही केला. पण अचानक असे काय झाले की आजच्या महत्त्वाच्या सभेतून सरळ उमेदवाचे अस्तित्वच गायब करण्याचा प्रयत्न होत आहे. याचे उत्तर साधे आहे. त्यांना सुरुवातीला कोणताही राजकीय अनुभव नसलेले श्रीराम पाटील हे कच्चा लिंबू वाटले. परंतु आता श्रीराम पाटलांचा प्रचार आणि झंझावात सुरू झाला आहे, श्रीराम पाटील जवळपास दररोज ३५ की.मी. पायी चालत रात्रंदिवस प्रचार दौरे करीत आहेत त्यामुळे त्यांच्या बाबत वातावरण निर्मित मोठ्या प्रमाणावर होत आहे. विविध समाज श्रीराम पटलांसाठी स्वतः हुन प्रचार करीत आहेत. आणि रक्षा खडसेंना त्यांनी दहा वर्षांत काय केले? असा थेट प्रश्न गावागावांत लोक विचारत आहेत. अशा परिस्थितीत आपण ज्याला नवखा कच्चा लिंबू समजत होतो तोच उमेदवार निवडून येतो की काय ?आणि आपल्या कुटुंबाची मक्तेदारी संपते की काय ? असा प्रश्न सहाजिकच रोहिणी खडसे यांना पडला असावा. आपल्याशिवाय मुक्ताईनगर नाही असेच काही तरी ताईंना दाखवून द्यायचे असेल.
खडसे कुटुंब मराठा द्वेष करतेहे सर्वश्रुत आहे. त्याचा पुरावा आजचे हे बॅनर. बहुदा खडसे कुटुंबीयांचा घरात एक खासदार आणि दोन आमदार ठेवण्याचे नियोजन श्रीराम पाटलांच्या झंझावाताने मोडून काढण्यास सुरुवात केली असावी म्हणून ताईंनी बॅनर वर श्रीरामांना येऊ दिले नसावे. पण ताई जो जनतेच्या मनात आहे तो श्रीराम तुम्ही बॅनर वरून पुसला तरीही मनातून कसा काढाल.