• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

editor desk by editor desk
May 2, 2024
in चाळीसगाव, जळगाव
0
करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

पाचोरा : प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उन्हातान्हाची परवा न करता नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावा-गावात, घरोघरी जावून प्रचार करीत असतांना आता करणदादा पाटील यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरुवार, २ रोजी पाचोरा शहरातून काढण्यात प्रचार रॅलीत त्यांनी सहभागी होत पाचोरेकरांना मतदानासाठी साद घातली.

शिवसेनेचे उमेदवार करणदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून जळगाव लोकसभा मतदार संघातील महाविकास विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते गावागावात जावून घराघरापर्यंत पोहचून मशाल हे चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. करणदादा पाटील हे देखील स्वतः जनतेपर्यंत पोहचत आहेत. आता त्यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरवारी त्यांनी पाचोरा-भडगावच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासाथीने पाचोरा शहरातील विविध भागात जावून ‘मशाल’ चिन्हा समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालयासमोरील म्हसोबा महाराज मंदिरात नारळ ओवाळून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन परिसर, चौधरी वाडा, बाहेरपुरा, मच्छी बाजार, आठवडे बाजार, रथ गल्ली, गांधी चौक, जामनेर रोड, स्व. के. एम. पाटील व्यापारी संकुल, श्री. महावीर शॉपिंग कॉम्प्लेक्स, मानसिंगका कॉर्नर, गणेश प्लाझा मार्गे पुन्हा शिवसेना कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, नगरसेवक भैय्या चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भिकन आहीरे, किशोर वानखेडे, पिंटू वानखेडे, भूषण वानखेडे, विशाल वानखेडे, चंदू मिस्तारी, अतुल मराठे, विशाल महाजन, कामगार सेनाचे माजी जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, विनोद पाटील, बापूसाहेब पाटील, विभाग प्रमुख आप्पा महाजन, दादाभाऊ पाटील, युवासेनेचे उप तालुकाध्यक्ष सागर पाटील, एकनाथ अहिरे, देविदास पाटील, बापू पाटील, माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, जिल्हाप्रमुख दीपकभाऊ राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, शशी पाटील, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, मिथुन वाघ, राजू काळे, पप्पू राजपूत, इमरान पिंजारी, ललित वाघ, मुरान तडवी, प्रदिप वाघ, शरद पाटील, विक्रांत पाटील, बातसरचे माजी उपसरपंच धर्मराज पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, यशवंत पवार, भाऊसाहेब पाटील, अण्णा पाटील, बाळू पाटील यांसह शेकडो, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारावेळी फटाके फोडल्याने वडाच्या झाडास व शेतकऱ्याच्या गोडाऊनला लागली आग….

Next Post

भाजप खरंच संविधान बदलणार का? रामदास आठवले

Next Post
भाजप खरंच संविधान बदलणार का? रामदास आठवले

भाजप खरंच संविधान बदलणार का? रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group