लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोवीड प्रशासनाने शुक्रवारी पाठविलेल्या कोरेाना अहवाला दिवसभरात एकुण ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यात आज शुक्रवार ७ जानेवारी रोजी दिवसभरात एकुण ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर -३१, भुसावळ तालुका-२४, चोपडा-२७, यावल-२, रावेर-१, चाळीसगाव -३ असे एकुण ८८ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात २२३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ४० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जळगाव शहरासह चोपडा आणि अमळनेर तालुक्यातील रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.