रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील विवरे बु. येथील ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी तक्रारदाराला बँक कर्जासाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायतीतील आवश्यक कागदपत्रे काढून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला नमुना क्रमांक ८, फेरफार दाखला, नकाशा आणि ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी जावळे यांनी दि. २१ रोजी दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यात संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सापळा रचला. त्यात पंचासमक्ष जावळे याने पाच हजार रुपये लाच मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव यांचे नेतृत्वाखाली दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली