लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमोल छगन सपकाळे (वय-३१) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. अमोल हा भाऊ रविंद्र आणि आई विजूबाई यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी आणि वाहन चालकाचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता आईला गावाला जावून येतो असे सांगून घराबाहेर निघाला. अमोल हा गावाला न जाता आव्हाणे शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ३००/ ३७ ते ३२६ या दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी जळगाव स्टेशनमास्तर यांच्या खबरीवरून तालुका पोलीसात नोंद करण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशील पाटील आणि दिपक कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुशील पाटील व दिपक कोळी करीत आहे.