मुक्ताईनगर भाऊंचे नाव महाराष्ट्रात सर्वांना माहीत आहे. एकाच वेळी १२ खात्यांचे धुरा असण्याचा रेकॉर्ड यांच्या नावावर आहे. महत्वाचे म्हणजे जळगाव जिल्ह्यात आपल्या कुटुंबाला कोणी पर्याय होऊच शकत नाही आणि तो आलाच तर तो येनकेन प्रकारे आपण संपवतो असा आविर्भाव भाउंकडे आहे. हा आविर्भाव आला कुठून ?जेंव्हा यांनी एक एक व्यक्ती राजकारणातून बेदखल करण्याची सुरुवात केली तेंव्हा पासून. यांच्याच लेवा समाजातील माजी खासदार व आमदार राहिलेले कै. हरिभाऊ जावळे यांची राजकीय कारकीर्द संपविली ती आदरणीय मुक्ताईनगरच्या भाउंनीच. हरिभाऊ जेंव्हा तिसऱ्यांदा खासदार होणार होते त्यावेळी यांनी पक्षाच्या नेत्यांना आपल्या घरातील महिलेसाठी भावनिक साद घालून हरीभाऊंचे खासदारकीचे तिकीट कापले..तिसऱ्या वेळी हरीभाऊ खासदार झाले असते तर केंद्रीय मंत्रिपदाची माळ हरीभाऊंच्या गळ्यात पडली असती.
पुढे हरीभाऊ आमदार झाले. राज्याचे कृषी मंत्री होण्याचे आमंत्रण पक्षाकडून मिळाले आणि हरीभाऊ मंत्रिपद स्वीकारण्यासाठी रेल्वेत बसले असताना अचानक फोन आला आणि त्यांना मंत्रिपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. यासर्वांमागे करता करविता मुक्ताईनगरचे भाऊच होते. कारण भाऊंना त्यांच्या समाजात आणि एकूणच जळगाव जिल्ह्यात कोणालाच मोठा नेता होऊ द्यायचे नव्हते. या भाऊंची लालसा पुढे इतकी वाढली की त्यांनी एकूणच महाराष्ट्रात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ज्यांनी खानदेशात शिक्षणाची गंगा आणली, हतनूर सारखे प्रकल्प उभेकरून रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यांचा पट्टा पाणीदार केला अशा आदरणीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी दूरदृष्टीने व कष्टाने उभे केलेले साकेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अभ्यासू बाळासाहेबांचे शैक्षणिक कष्ट जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांनी पाहिले होते लेवा समाजाचा संताप पाहून मुक्ताईनगरचे भाऊ पाय उतार झाले. ज्या बाळासाहेब चौधरींनी लेवा समाजाला आरक्षण मिळवून दिले अनेक घरांत शिक्षणाचे दिवे पेटविले त्यांच्याच अस्तित्वावर घाला घालण्याची हिम्मत सत्तेच्या उन्मादात मुक्ताईनगरच्या भाऊंनी केली.
म्हणजे भाऊंना जळगाव जिल्ह्यात माझेच साम्राज्य हवे असेच दिसून येते. भुसावळचे आमदार संतोष चौधरी ज्यांनी कोणताही राजकीय वारसा नसतांना आपल्या कार्य कर्तृत्वावर भुसावळ शहराचे शिल्पकार म्हणून नावलौकिक मिळविला. त्या आमदार चौधरींना संपविण्याचा विडाच जणू मुक्ताईनगरच्या भाऊंनी उचलला. एका केस मध्ये तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळ आमदार संतोष चौधरींना कैदेत ठेवले व त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईनगर भाऊंनी भुसावळ शहरात पाय ठेवला आणि एक सुंदर स्वच्छ शहर बकाल झाले. याच प्रमाणे राज्यातील एक अभ्यासू नेतृत्व जळगावचे आमदार सुरेश जैन यांना सुद्धा मुक्ताईनगर भाऊंनी राजकारणातून उठवले. एक सुंदर शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहराला पण भयाण रूप आले. भाऊ जिथे जातात तिथल्या लोकांना संपवता आणि तो भाग भकास करतात. काही म्हणतात जो आपल्या जातीतल्या लोकांचा नाही झाला तू दुसऱ्यांचा काय होणार. आता केवळ सत्तेसाठी भाऊ कुंपणावर आहे अर्थात जिथे सत्तेच्या चाव्या मिळतील तिथे भाऊ कुटुंबासाठी तय्यार .या मुक्ताईनगर भाऊंनी अनेक अधिकारी, राजकारणी, समाजकारणी लोकांना आयुष्यातून उठवले. राज्यातलं सर्वात खुनशी राजकारणी आणि ज्यांना कधीकाळी आदरणीय पवारसाहेबांनी सुद्धा ब्लॅक मेलर विरोधी पक्ष नेता म्हणून संबोधले होते असे मुक्ताईनगर भाऊ. असो राजकारणात काहीच भरवसा नसतो. आदरणीय भाऊंच्या कार्य महान आहे त्यामुळे आता सर्वकाही शक्य आहे नो चिंता भाऊ पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
तुमचा
रावेरकर मतदार