जळगाव : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांच्या जागी उद्योगपती श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र रवींद्र भैय्या पाटील यांची उमेदवारी कापण्यात कटकारस्थान झाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर रवींद्र भैया यांनी दिलेल्या खुलासा केला असून, उमेदवारी कापण्यात कुठेही कटकारस्थान झाले नाही, मी तिकीट मागितले होते, साहेबांचे राजकीय गणित असतात त्यामुळे त्यांनी मला थांबायला सांगितले, आणि त्यांच्या आदेशाची मी पालन करत असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जोमाने आमचे काम सुरू आहे असा खुलासा पाटील यांनी केला.
रवींद्रभैय्या पाटील यांच्या गावाजवळी अंतुरली चांगदेव मानमोडी रुईखेडा निमखेडी येथे असलेला दांडगा जनसंपर्क व राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हाप्रमुख पद सांभाळून पक्ष वाढीसाठी सुरू असलेले काम हे त्यांचे सर्वश्रुत आहे. पक्षनिष्ठ असलेला कार्यकर्ता रवींद्र भैया यांचे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी त्यांनी मागितली होती. पण त्यांना डावलून त्यांच्या जागी श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचा चर्चा व उमेदवारी कट करण्यात कारस्थान झाल्याचे चर्चा होती.
साहेबांचे आदेशाचे पालन मी करतोय!
शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचे नेतृत्व करत असून आम्ही त्यांची विचारधारा जळगाव जिल्ह्यात रुजवण्याचे काम आमचे सुरू आहे. यापूर्वी मला उमेदवारी न मागता सुद्धा उमेदवारी मिळाली होती. यावेळेस मी उमेदवारी मागितली पण पवार साहेबांनी मला थांबण्याचे सांगितले. यात पवार साहेबांचे राजकीय गणित असून त्यांच्या आदेशाच्या बाहेर आम्ही नाही. त्यांच्या आदेशा नुसार आम्ही आम्ही राष्ट्रवादी चा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करत आहोत. उमेदवारी कट करण्यामध्ये कोणतेही कटकारस्थान झालेले नाही, अशी चुकीची अफवा ही पसरवली जात असून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपल्याला राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणायचा आहे अशा आवाहन रवींद्र भैया पाटील यांनी केले.