यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील वाघझिरा येथे गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून यावल पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी यावल पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार सुशील घुगे, उमेश महाजन या पथकाने गावठी हातभट्टीची दारू, कच्चे, पक्के रसायन, दारू गाळणी करण्याचे साहित्य असा एकूण ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. हवालदार सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून पठाण बारेला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार उमेश महाजन करीत आहेत