• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लोखंडाने भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला

editor desk by editor desk
April 26, 2024
in अमळनेर, क्राईम
0
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

अमळनेर : प्रतिनिधी

मध्य प्रदेशातील इंदोर व धार दरम्यान चोरून आणलेला लोखंडाने भरलेला ट्रक एस. एस. टी. पथकाच्या सतर्कतेने तालुक्यातील मुडी, मांडळ भागात पकडण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक व लोखंड असा एकूण २० लाखांचा माल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, इंदोर आणि धार जिल्ह्याच्या दरम्यान घाटाबिल्लो येथील इम्रान मोहम्मद शेर मोहम्मद याच्या घरासमोरून १० ते १२ टन लोखंडाने भरलेला ट्रक (एमपी- ४०, जीए ७७८) हा अज्ञात चोरट्याने २३ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरून नेला होता. हा ट्रक २४ रोजी पहाटे अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ भागातून जात होता. दरम्यान, निवडणूक कामासाठी तयार केलेल्या चेकपोस्टवर असलेले विस्तार अधिकारी सुरेश कठाडे, हे.कॉ. भरत गायकवाड व पो.कॉ. दिनेश पाटील यांनी ट्रक थांबवून गाडीचे कागदपत्रे चालकाकडे मागितले. चालकाने कागदपत्र दिले.

मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चालकाला खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळी तो खाली उतरताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दाट झाडीत पळून गेला. या वाहनात अंदाजे १० लाख किमतीची १० ते १५ टन लोखंडी सळई आढळून आली आहे. तर वाहनाची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. वाहन व हा मुद्देमाल मारवड पोलिसात जमा करण्यात आला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पो. हे. कॉ. भरत इशी करीत आहेत. दरम्यान, इम्रान मोहम्मद याने पेटमा (जि. इंदोर) येथे ट्रक चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

Previous Post

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Next Post

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे शिरसोली, चिंचोली, धानवड येथे जोरदार स्वागत

Next Post
महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे शिरसोली, चिंचोली, धानवड येथे जोरदार स्वागत

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे शिरसोली, चिंचोली, धानवड येथे जोरदार स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group