विजय पाटील : जळगाव
लोकसभा निवडणुकीतील जळगाव मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील (पवार) यांचा दांडगा जनसंपर्क व युवकांमधील असलेला संपर्काच्या जोरावर त्यांनी जळगाव मतदारसंघात प्रचाराची जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांची मतदारसंघांमध्ये दररोज प्रचार सभा व गाठीभेटी या सुरू आहे.
जळगाव मतदारसंघात मावीआचे उमेदवार करण पाटील (पवार) हे भाजपचे स्मिता वाघ यांच्याशी त्यांची सरळ लढत आहे. करण पवार यांचे जनसामान्यांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क च्या जोरावर त्यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून ते घराघरापर्यंत पोहोचण्यात त्यांना यश मिळालेले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये त्यांचा संपर्क असल्याने त्याचे गाठीभेटी सोबत सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ बांधण्यात ते यशस्वी झाल्याचे प्रचारामध्ये दिसत आहे.
राजकीय पक्षांमधील ही मैत्रीचे संबंध
करण पवार हे आधी भाजपमध्ये होते आता ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांचे मित्र व माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबत गेले आहेत. मात्र त्यांचा मित्रपरिवार तसेच दांडगा जनसंपर्क त्यात सोबत मित्र पक्षातील मैत्रीचे संबंध असल्याने ते प्रचार जोरदार करत आहे.
मराठा समाज कार्ड चालणार का?
मतदारसंघातील जातीय समीकरण लक्षात घेत करण पवार यांचे मराठा कार्ड वर मतांचे गणित बांधल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रचार देखील त्यांचा सुरू असल्याचे दिसत असून त्यांची रणनीती देखील जोरदार सुरू असल्याचे दिसत आहे.
उमेश पाटील यांचे यांचे खंबीर पाठबळ
करण पवार यांचे मित्र व माजी खासदार उन्मेश पाटील हे करण पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे असून त्यांचा प्रचाराचा धुरा सगळ्या त्यांनी सांभाळलेला आहे. विरोधी नेत्यांवर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन गंभीर आरोप आरोप करून त्यांची पोलखोल जनतेपुढे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झालेला दिसत आहे. त्यामुळे करण पवार यांचा प्रचाराचा धुराळा ग्रामीण भागात जोरदार सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.