• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पष्टाणे गावात महामातांच्या कार्याचा जागर

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 6, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
पष्टाणे गावात महामातांच्या कार्याचा जागर

महामातांच्या कार्यातून जगण्याची प्रेरणा मिळते – लक्ष्मणराव पाटील

धरणगांव प्रतिनिधी : बुधवार रोजी धरणगाव तालुक्यातील पष्टाणे बु. गावात माँसाहेब जिजाऊ ते क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून महामातांच्या कार्याचा जागर करण्यात आला.

या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक हेमंत माळी यांनी केले. प्रास्ताविकात माँसाहेब जिजाऊ ते ज्ञानज्योती सावित्रीमाई या मातांचा जन्मोत्सवानिमित्त नऊ दिवसाचा प्रबोधनाचा जागर धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात करण्यात येत आहे. यामध्ये विवरे, भवरखेडे, पष्टाणे, सोनवद, बांभोरी, गंगापुरी, धानोरे, गारखेडे या गावांचा समावेश आहे.

या वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्षस्थानी पष्टाणे गावाचे सरपंच शिवाजी सैंदाणे होते. प्रमुख वक्ते महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून पष्टाणे गावाच्या उपसरपंच लताबाई पाटील, ग्रा.पं. सदस्य मुरलिधर पाटील, मनोज सोनवणे, रेखाबाई पाटील, संगिता पाटील, सोनाली पाटील, ग्रामसेवक चतुर देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले तसेच गावातील काही महिलांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व सर्व विचार मंचावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पष्टाणे बु. गावाचे माजी सरपंच किशोर निकम यांनी प्रमुख वक्ते पी.डी.पाटील, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचा परिचय करून दिला.

प्रमुख वक्ते पी.डी.पाटील यांनी शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला या सोबतच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्याराणी होळकर, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरागंणा झलकारी देवी या सर्व महामातांचे चरित्र उलगडले. या महामातांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजची महिला सक्षम झालेली आहे. या सर्व महामातांचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. इतिहासातील विविध उदाहरण दाखले देऊन उपस्थितांना महामाता यांचे कार्य विस्तृतपणे सांगितले. सावित्रीमाईंचे कार्य सांगत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची साथ खूप मोलाची होती.

शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम फुले दाम्पत्यांनी केलेले आहे. आजच्या सर्व माता – भगिनींनी माँसाहेब जिजाऊ ते सावित्रीमाई पर्यंतच्या महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे. अंधश्रद्धा, कर्मकांडापासून दूर रहा आणि शिक्षणाचा ध्यास घ्या. शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले होय, असे प्रतिपादन केले.

सर्व उपस्थित माता – भगिनी व बांधवांना विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले, महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ भेट देण्यात आले. या वैचारिक प्रबोधनाचे सूत्रसंचालन व आभार पष्टाणे बु. गावाचे माजी सरपंच किशोर निकम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पष्टाणे बु. गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विशेषतः युवक मित्रांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील बचतगटाच्या अध्यक्षा, सर्व सदस्य व महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

Previous Post

जीपीएस परिवारातर्फे अनोखा पत्रकार दिन साजरा

Next Post

धरणगावात भिल्ल वस्तीत माॅ साहेबांना अभिवादन !

Next Post
धरणगावात भिल्ल वस्तीत माॅ साहेबांना  अभिवादन !

धरणगावात भिल्ल वस्तीत माॅ साहेबांना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group