जळगाव : प्रतिनिधी
घरगुती वादातून विवाहितेला उपाशी ठेवत तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. ही घटना दि. २२ एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तांबापुरा परिसरातील माहेर असलेल्या निलोफर शेख वसीम कुरेशी (वय २६) यांचा विवाह जामनेर तालुक्यातील वाघारी येथील शेख वसीम शेख फरीद कुरेशी यांच्यासोबत झाला आहे. घरगुती वादाच्या कारणावरुन पतीसह सासरच्यांकडून विवाहितेला वेळोवेळी शिवीगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर मारुन टाकण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेचा उपाशी ठेवून शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर दि. २२ एप्रिल रोजी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती शेख वसीम शेख फरीद कुरेशी, सासरे शेख फरीद शेख कालू, सासू बसनूरबी शेख फरीद कुरेशी, नणंद रुबीनाबी अस्लम कुरेशी, अस्लम शेख इस्माईल कुरेशी सर्व रा. वाघाडी, ता. जामनेर, रुक्सानाबी उर्फ गौरी शेख युसूफ, यास्मिन कैसर कुरेशी दोघ रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर, शब्बोवी शेख जावेद कुरेशी रा. घाट नांदरा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजी नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.