जळगाव : प्रतिनिधी
कुसुंबा शिवारातील फातेमा नगरात तरूणाच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच रोख 23 हजारांची रोकड मिळून एकूण 43 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना बुधवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शनिवारी 20 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, अमन अनिस पटेल (30, रा. फातेमा नगर, कुसुंबा शिवार) हे आपल्या परिवारसह वास्तव्याला आहे. एका कंपनीमध्ये सेल्समन आहेत. मंगळवार, 16 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता ते घर बंद करून बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून 20 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, रोख 23 हजार रुपये असा एकूण 43 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
बुधवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता अमन पटेल हे घरी आले त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी 20 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.