भुसावळ : प्रतिनिधी
प्रेरणा एक्स्प्रेसमध्ये एकाच दिवशी दोन चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यात एका महिलेच्या पर्समधून २ लाख २५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत तर दुसऱ्या घटनेत महागडा मोबाइल फोन चोरीला गेला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अजय आसुदानी, रा. नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते त्यांच्या आईसोबत बडोदा ते नागपूर असा प्रवास करत होते. त्यात त्यांच्या आईजवळ असलेला पर्स चोरीला गेला आहे. त्यात २ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्याचे नेकलेस होते. सोबत २० हजार रोख आणि मोबाईल देखील होता. या प्रकरणी पोना. कराळे हे तपास करत आहेत तर दुसऱ्या घटनेत ध्रुवी जयकुमार पोकर आणि अब्बास अन्सारी यांनी फिर्याद आहे. त्यात दोन पर्स चोरीला गेल्या आहेत. त्यातून सुमारे ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास झाला आहे. या दोन्ही पर्समधून महागडे मोबाईल फोन, एटीएम कार्ड, इतर कागदपत्रे चोरीला गेली आहेत